चाळकवाडीत मराठीभाषा दिनानिमित्त शिवांजली साहित्य महोत्सव
1 min read
पिंपळवंडी दि.२५:-चाळकवाडी ( ता. जुन्नर) येथे मराठीभाषा दिनानिमित्त गुरुवार ( दि २७) पासून बत्तीसाव्या शिवांजली साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष व स्वागत प्रमुख शिवाजीराव चाळक यांनी दिली.
याबाबत बोलताना त्यांनी सांगीतले की शिवांजली साहित्यपीठ महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्यसंस्था शाखा चाळकवाडी यांच्या वतीने गेल्या एकतीस वर्षांपासून या शिवांजली साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या साहित्य संम्मेलनाचा प्रारंभ गुरुवार ( दि २७) पासून चाळकवाडी – नाणेघाट ते चाळकवाडी असा मराठी भाषा दिंडी व शिलालेख पुजनाने होणार आहे शुक्रवारी ( दि २८) साहित्य विज्ञान पर्यटन अंतर्गत उपस्थित साहित्यिक खोडद येथील महादूर्बिनिला भेट देणार आहेत शनिवारी ( दि १मार्च) ग्रंथदिंडी ध्वजारोहन उदघाटन समारंभ व सन्मान सोहळा मराठी भाषा अभिजात झाली.
या विषयावर परिसवाद शालेय मुलांचे कवीसंम्मेलन निमंत्रित कवींचे कवीसंम्मेलन शेकोटी गजल संम्मेलन होणार आहे रविवारी ( दि २ मार्च) निमंत्रित कवींचे दुसरे कवीसंम्मेल आजचे बालक पालक कथाकथन लोकसाहित्याचे अंतरंग मुक्तसंवाद आदी कार्यक्रम होणार असून.
या कार्यक्रमाची सांगता सन्मान सोहळा समारोप व गाठीभेटी या कार्यक्रमाने होणार असल्याचे शिवाजीराव चाळक यांनी सांगीतले.चार दिवस चालणा-या या शिवांजली साहित्य महोत्सवास राज्यभरामधील नामवंत साहित्यिक कवी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.