रोटरी क्लब च्या माध्यमातून इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेला दोन संगणक भेट
1 min read
बेल्हे दि.२३:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर (बेल्हे) या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरी पिंपरी पुणे या संस्थेच्या वतीने संगणक काळाची गरज ओळखून मुलांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन संगणक देण्यात आले. या प्रसंगी या क्लबचे अध्यक्ष प्रेसिडेंट सर्व सदस्य प्रशांत शेजवळ, विश्वजित हरगुडे, उदय कुलकर्णी, जयकुमार गुजर, धनंजय कदम हजर होते. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण गुंजाळ उपाध्यक्ष अंजुम शेख अध्यक्ष शरद भंडलकर, रोहिदास विसावे, प्रियंका देशमुख, प्रियंका शिरसाट, आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन निवृती हाडवळे यांनी केले. या संस्थेमार्फत आपल्या शाळेला 25 बेंच मिळणार आहेत असेही रोटरी क्लबचे अध्यक्ष यांनी जाहीर केले. या शाळेसाठी जे जे कमी पडेल तेथे आम्ही आहोत. असे या वेळी त्यांनी सांगितले.