छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुस्तकात न ठेवता आपल्या जीवनामध्ये गुण आत्मसात करा, जीवन सुखकर होईल:- सौरभ शिंदे

1 min read

आळे दि.२३:- बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळे या महाविद्यालयामध्ये शिवजयंती निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण वक्त्यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 21 व्या शतकातील व समाजातील शिबिर मधील प्रमुख वक्ते प्रसिद्ध व्याख्याते सौरभ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिवजयंती निमित्त बोलताना शिवव्याख्याते सौरभ शिंदे म्हणाले की, कोणतेही काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुस्तकात न ठेवता आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करा जीवन सुखकर होईल असा सल्ला या वेळेस दिला.यावेळी विविध वक्ते त्यामध्ये डॉ.लहू गायकवाड, ह.भ.प. मा.विशाल फलके उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले बहि:शाला विभागाचे प्रमुख डॉ. अरुणा वाघोले, प्रा राज जगताप आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा अश्विनी खंडागळे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे