चाकणला कांद्याची उच्चांकी आवक; दरात मोठी घसरण

1 min read

चाकण दि.२४:- चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा व वाटाण्याची भरपूर आवक झाली. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. टोमॅटो, कारली व गाजराचे भाव किंचित वधारले; तर पालेभाज्यांचे भाव गडगडले. एकूण उलाढाल ७कोटी ६० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३४ हजार पिशवी म्हणजेच १७,००० क्विटल एवढी उच्चांकी झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीने वाढल्याने भावात एक हजार रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल भाव ३ हजार ५०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विटलने घटून भावात देखील १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २ हजार रुपयांवरून १ हजार ९०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २८ क्विटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक तीन क्विटलने वाढल्याने भावात घसरण झाली. लसणाचा कमाल भाव १८ हजार रुपयांवरून १० हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९० क्विटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे