विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीत शिवजयंती निमित्त पर्यांवरणपूरक किल्ले बनविणे स्पर्धा
1 min read
साकोरी दि.२१:- विद्यानिकेत इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी विद्यालयात स्वराज्यनिर्माते श्री शिवछत्रपतींच्या जन्मसोहळ्याचे औचित्य साधून किल्ले बनविणे ही स्पर्धा -उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचा उद्देश आपला इतिहास /भूगोल माहिती होणे, तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळणे मोबाईल हातात घेऊन. खेळणाऱ्या मुलांना दगड, मातीत खेळण्याचा आनंद मिळावा व लोप पावत चाललेली ही मातीचे किल्ले बनविण्याची परंपरा जागृत व्हावी. ही स्पर्धा इ.५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेत ४ गट सहभागी झाले होते. वायू (air), जल (water), अग्नी (fire) आणि पृथ्वी (earth).
या गटांनी अनुक्रमे सिंधुदुर्ग, शिवनेरी, प्रतापगड व रायगड हे किल्ले बनवले. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गटप्रमुख शिक्षक प्रतिभा विश्वासराव, अपेक्षा पोळ, श्रद्धा वाघ, दिपाली ढवळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः किल्ले बनविण्याचा अनुभव घेतला. विशेष गोष्ट म्हणजे किल्ले बनविताना प्लास्टिक, थर्माकोलचा वापर केला नाही.
किल्ले बनविताना प्रत्यक्ष त्या किल्ल्यांचा मुलांनी अभ्यास केला होता. प्रत्येक गटप्रमुखाने त्या त्या किल्ल्याविषयी माहिती सांगितली. या स्पर्धा-उपक्रमास परीक्षक म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), उपप्राचार्य शरद गोरडे, विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गणेश करडीले, तसेच कलाशिक्षक विनोद उघडे,
अहिरे प्रवीण, विशाल जाधव यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांचे कौतुक करत सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दुपारच्या सत्रात परीक्षण करून प्रत्येक गटाला क्रमांक देण्यात आला.यामध्ये अपेक्षा पोळ यांच्या वायू (air) या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.तर प्रतिभा विश्वासराव यांच्या जल ( water)
या गटाने द्वितीय क्रमांक, श्रद्धा वाघ यांच्या पृथ्वी (Earth) या गटाने तृतीय व दिपाली ढवळे यांच्या अग्नी (fire) या गटाने चतुर्थ क्रमांक मिळवला. यावेळी संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे हे देखील उपस्थित होते. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.