समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश

बेल्हे दि.२०: – अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बँगलोर येथे झालेल्या “अन्वेषण” या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत समर्थच्या विद्यार्थ्यांना “१०० टाईम्स क्युरियस क्वेश्चन अवार्ड ” हे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.ही स्पर्धा सॅमसंग सेमिकन्डक्टर इंडिया यांनी पुरस्कृत केली होती. अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय, बेल्हे कम्प्युटर इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश आणि समर्थ गुरुकुल मधील प्रगती औटी व प्रांजल दाते या ग्रुप ने सादर केलेल्या “कृषी तज्ञ” या प्रकल्पान्वये विद्यार्थ्यांना विचारल्या गेलेल्या शंभर प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे देत समर्थ च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.रुपये पाच हजार रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर,प्रा.प्रियांका लोखंडे, प्रा.राणी बोऱ्हाडे तर समर्थ गुरुकुलच्या प्रिया कडूसकर यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे