दहावीच्या परीक्षेसाठी आळे केंद्रावर ७३६ विद्यार्थी; पर्यवेक्षक सभा संपन्न

1 min read

आळे दि.१९:- इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी मार्च 2025 परीक्षेसाठी पर्यवेक्षक सभा ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) येथे संपन्न झाली . इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आळे केंद्रावर 736 विद्यार्थी प्रविष्ठ होणार असून त्या बाबतची सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली. असल्याचे केंद्र संचालक संदीप भवारी यांनी सांगितले. पर्यवेक्षक सभेला केंद्र संचालक एस.एस भवारी, सहाय्यक केंद्र संचालक एस के कोते, जी.जे सूर्यवंशी, डी.के गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. या केंद्रावर आठ शाळांचे विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. ज्ञानमंदिर हायस्कूल आळे एसएससी बोर्ड परीक्षा केंद्र क्रमांक 1382 या केंद्राशी संलग्न असलेल्या शाळा. ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे छत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा, विद्या विकास मंदिर राजुरी, रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालय वडगाव आनंद, सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार, श्री संभाजी विद्यालय बोरी बुद्रुक, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे, जे.आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा, प्रविष्ट एकूण विद्यार्थी संख्या ७३६ आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे