व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंतीचा भव्य उत्सव साजरा

1 min read

वडगाव कांदळी दि.१९:- व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी जाधववाडी गावचे युवा सरपंच अजित जाधव, शिरोली गावच्या सरपंच प्रिया खिल्लारी, तांबेवाडी गावच्या सरपंच संगीता कुंजीर, तसेच रिटायर्ड सैनिक उमेश अवचट, काळवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब काकडे, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे, सदस्य सचिन बढे, सदस्या योजना भोर, वर्षा बढे, सुजाता भोर, शुभांगी गुंजाळ इ. मान्यवर उपस्थित होते. तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे विश्वस्त विक्रांत काळे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांची ही उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात अतिथी स्वागत, दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते झाली. मान्यवरांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवरायांच्या शौर्यगाथेचे स्वागतगीत सादर होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झाले. शाळेच्या शिक्षिका मनीषा हांडे यांनी प्रास्ताविक भाषण करत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्रातून शिकण्याची प्रेरणा मिळाली.सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे वैशिष्ट्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिवजन्मावर आधारित झुलवा पाळणा, शिवकन्या नृत्य आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. इ.3 री तील स्वरा डोमाळे आणि इ.7 वी तील देविका बढे यांनी शिवचरित्रावर तडफदार भाषण सादर केले,जे विशेष आकर्षण ठरले. शिवकालीन युद्धकलेचे थरारक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीची कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. शेवटच्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाचे भव्य दृश्य लेझीम आणि सर्कल फायरिंगच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले. संपूर्ण परिसर शिवगर्जनेच्या जयघोषाने दणाणून गेला.सूत्रसंचालनाची धुरा साईश्री खिल्लारी आणि भूमी रावळकर (इ. 8 वी) यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका स्वाती पवार यांनी उपस्थित मान्यवर,पालक वर्ग, मुख्याध्यापिका, समन्वयिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्याचे योगदान कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे मार्गदर्शन लाभले. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी आणि महेंद्र गुळवे यांनी विद्यार्थ्यांना युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. कलाशिक्षक रोशन बनकर यांनी उत्कृष्ट फलकलेखन केले. नृत्य शिक्षक विशाल अमोलिक यांनी नृत्यदिग्दर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.शाळेच्या समन्वयिका व शिक्षक वृंदाचे टीमवर्क, सहकार्याची भावना आणि मेहनतीचे कौतुक करण्यात आले. सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.एकूणच व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंतीचा सोहळा ऐतिहासिक आणि संस्मरणीय क्षण ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे