विशाल फार्मसी कॉलेज येथे फार्मोत्सव जल्लोष साजरा

1 min read

आळे दि.१७:- सांस्कृतीक कार्यक्रमांचे विदयार्थीदशेत अनन्यसाधारण महत्व असते व विदयार्थ्यांचे कलागुण जोपासन्याचे व वाढवण्याचे काम सांस्कृतीक कार्यक्रमांतून केले जाते. तसेच विदयार्थी सर्वात सुंदर हसल्यावर दिसतात असे प्रतिवादन विशाल फार्मोत्सव २०२५ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल वसंत दिक्षीत (सारंगनिल) जी. डी. आर्ट (कमर्शियल आर्टिस्ट) यांनी केले. विशाल जुन्नर सेवा मंडळ फार्मसी कॉलेजमध्ये विशाल फार्मोत्सव २०२५ उत्साहात पार पडला.या फार्मोत्सवाची सुरूवात दि. २८ जानेवारी २०२५ या दिवशी रक्तदान शिबिराने झाली. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मा. उपाअध्यक्ष जिल्हा परिषद पुणे शरद लेंडे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये ८६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. डॉ. जिवन राठोड पुना ब्लड बँक यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना रक्तदानाचे महत्व सांगितले तसेच ३५० मिली. ब्लड एका वेळी रक्तदान करू शकतो व थ्यालेसेमिया सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी रक्ताचा उपयोग केला जातो. तसेच निरोगी व्यक्ती प्रत्येक तीन महिन्यानंतर रक्तदान करू शकतो, या विषयी मर्ग दर्शन केले. तसेच शरद लेंडे यांनी सर्व विदयार्थ्यांना रक्तदान करण्यासाठी आव्हान केले.त्यानंतर ट्रेडीशनल डे, समुह नृत्य, वैयक्तिक नृत्य, एकपात्री अभिनय, नाटक, फॉशनशो या स्पर्धा ‘चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाच्या उदघाटण प्रसंगी जुन्नर पंचायत समिती सदस्य जिवन शिंदे उपस्थित होते. सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला व विशाल फार्मोत्सव २०२५ जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी अंतिम वर्ष बी. फार्मसीच्या विदयार्थ्यांनी पटकवली उपस्थित संस्थेचे पदाधिका-यांकडून विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.या फार्मोत्सव मध्ये तालुक्याचे आमदार (किल्ले शिवनेरी) शरद सोनवणे यांनी सदिच्छा भेट दिली व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. ए. एस. ताजवे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. एस. कोल्हे यांनी मानले.आळे येथील विशाल जुन्नर सेवा मंडळ फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, सचिव विजय पारखे, खजिनदार शिवाजी बांगर, विश्वस्त लक्ष्मण कोरडे, विक्रांत काळे, वसंत पाडेकर, महेंद्र शिंदे, माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित, संचालक, भास्कर गाडगे, सुभाष पाडेकर, संचालिका, सुप्रिया मेटांगळे, विशाल जुन्नर सेवा मंडळ, माजी विश्वस्त वसंत लोहोटे, जेष्ठ सभासद रामदास वामन, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव, प्राचार्या डॉ. आर. ए. हांडे, प्राचार्या डॉ. ए. एस ताजवे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे