ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचं मनन, चिंतन व आवलोकन व्हावं:- किसन चौधरी महाराज

1 min read

शिरोली दि.१७:- संत ज्ञानेश्वरांनी विश्वप्रार्थना करून समाजाचा उद्धार केला. पसायदान म्हणजेच प्रार्थना, ती सार्थकी लावायची असेल तर, आज घराघरात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचं मनन, चिंतन व आवलोकन व्हावं तोच आत्मकल्याचा मार्ग आहे असे ह. भ.प. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त किसन चौधरी महाराज यांनी न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे (सुलतानपूर बोरी) येथे केले. यावेळी मुख्याध्यापक एम.एम. बोऱ्हाडे, ढगे एस. जे, आर बी गिलबिले, ए.बी. तट्टू शाळा व्यवस्थापन चे माजी अध्यक्ष राजू पोळ, मणियार ए.ए. उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे (सुलतानपूर बोरी) विद्यालयात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे व्याख्यान. विद्यार्थ्यांच्या विचार शक्तीला व नवनिर्मितीला चालना विचारांची आदान -प्रदान होणे गरजेचे असते. हाच व्याख्यानाचा मुख्य उद्देश होता. ह.भ.प.किसन महाराज हे साहित्य विशारद असून आत्तापर्यंत खूप ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. संत वाङ्मयावर गाढा अभ्यास आहे. अत्यंत साध्या सोप्या भाषेत पसायदानावरती भाष्य करून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे अध्यात्मा विषयी आवड निर्माण करून दिली. न्यू इंग्लिश स्कूल शिरोली तर्फे आळे, (सुलतानपूर -बोरी जि.प. प्रा. शाळा सुलतानपूर,येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यालयात विविध कार्यक्रम होत असतात. विद्यार्थ्यांच्या वाचन प्रेरणेला अंगभूत घटक. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रंथांची, पुस्तकांची आवड निर्माण व्हावी म्हणून, वक्ता व श्रोता यांच्या विचारांची आदान- प्रदान महत्त्वाची असते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, पाहुण्यांची ओळख व आभार सेवक कल्याण निधीचे संचालक व विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र बोऱ्हाडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे