महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी समर्थ फार्मसीच्या पूजा औटी ची निवड
1 min read
बेल्हे दि.१५:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील पूजा औटी या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी दिली.
यापूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेमध्ये पूजा औटी हिने नेत्रदीपक कामगिरी बजावलेली होती. त्याचप्रमाणे त्यानंतर झालेल्या विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धेत देखील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले होते.१७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी सदर विद्यार्थिनीची निवड झाल्याचे वृत्त क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिले.
या स्पर्धेमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना कबड्डीच्या विविध डावपेचाचे तसेच आपली वेगळी शैली अंगीकृत करून यश मिळण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाल्याचे पूजा औटी हिने सांगितले.
क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाचे सुरेश काकडे,डॉ.सचिन भालेकर,मोनिका चव्हाण,सिद्धेश्वर वायसे यांनी पूजा औटी हिला मार्गदर्शन केले.विद्यापीठ स्तरीय या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,
विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूजा औटी हिचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.