बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान

1 min read

बेल्हे दि.१६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज बेल्हे येथे नुकताच जुन्नर तालुका बार असोसिएशन कार्यकारणी सत्कार समारंभ व ॲडवोकेट अहमदखान पठाण सर यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्थेचे मार्गदर्शक व सल्लागार ॲडव्होकेट सुधीर कोकाटे यांनी ॲडव्होकेट अहमद पठाण खान यांचा परिचय करून दिला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माउली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे, प्रा.शिवाजी कुमकर, डॉ.लक्ष्मण घोलप, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने ॲडव्होकेट अहमदखान पठाण सर यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा परिषदेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य यांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे कायदेविषयक सल्लागार व मार्गदर्शक ॲडव्होकेट सुधीर कोकाटे, ॲडव्होकेट फारुख पठाण, नवनिर्वाचित सदस्य ॲडव्होकेट गणेश आल्हाट, ॲडव्होकेट सुजाता गाडेकर, ॲडव्होकेट नूतन शेगर, ॲडव्होकेट फारुख पठाण यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी अहमद खान पठाण सरांनी कायद्यातील काही विषयांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या संज्ञा अतिशय सोप्या आणि साध्या, सरळ शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.

शेळके कुटुंबीयांनी समर्थ शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून या माळरानावर ज्ञानदानाचं जे नंदनवन फुलवलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोग असल्याचं मत ॲडव्होकेट अहेमद पठाण सर यांनी व्यक्त केलं.कायद्याविषयी बोलताना ते म्हणाले की, कायदे कसे असावेत? तर समाजाच्या बदलत्या गरजांची पूर्तता करणारे असावेत.कायदा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून स्पर्धा परीक्षा मध्ये करियर करण्यासाठी कायद्याचे नाव आवश्यक आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.हसत खेळत एखादा विषय कसा सोपा होईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा.
वकिली क्षेत्राविषयी बोलताना अहमद खान पठाण सर म्हणाले की, वकिली क्षेत्रामध्ये आज करिअरच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत.अनेक उद्योग व्यवसायामध्ये मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी पदावर पोहोचण्यासाठी वकिली क्षेत्रातील ज्ञान आणि अभ्यास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मराठी मध्ये नोट्स बनवायल्या सुरुवात करणार असल्याचे यावेळी ॲडवोकेट अहेमद खान पठाण यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक समर्थ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे यांनी तर आभार प्रा.शिवाजी कुमकर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे