मोठी बातमी !मुंबईतील ओशिवरा परिसरात फर्निचर मार्केटला भीषण आग; आगीमध्ये ५० ते ६० दुकाने जळून खाक?
1 min read
- मुंबई दि.११:- मुंबईतील जोगेश्वरी ओशिवरा परिसरात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे. ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. या आगीमध्ये ५० ते ६० दुकाने जळून खाक झाली आहेत. लाकडाची दुकानं असल्यामुळे आग वाढत चालली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून.
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या परिसरामध्ये सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी ओशिवरा फर्निचर मार्केटला आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. या आगीमध्ये आतापर्यंत मार्केटमधील ५० ते ६० दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.आग लागल्यानंतर घटनास्थळावर सिलेंडरचा देखील स्फोट झाला. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. सध्या या परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
या आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. आग लागताच फर्निचर मार्केटमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी दुकानाबाहेर धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या आगीमध्ये फर्निचर मार्केटमधील अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.