आळे येथे होलम राजाच्या मानाच्या काठीचे जोरदार स्वागत

1 min read

आळेफाटा दि.९:- आळे (ता. जुन्नर) महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामी खंडोबा जेजुरी येथे माघ पौर्णिमा निमित्त मोठी यात्रा भरते. जेजुरी येथे महाराष्ट्रातुन तीन मानाच्या काठ्या जेजुरी येथे जात असतात. त्यात संगमनेर येथील काटे मंडळीचा देखील मान असतो. आळे येथे रविवारी सकाळी संगमनेर येथून आलेल्या होलम राजाच्या मानाच्या काठीचे आळे गावात जोरदार स्वागत करण्यात आले.होलम राजाची मानाची काठी आळे गावात अनेक वर्षांपासून येण्याची प्रथा आहे. सकाळी सात वाजता काठीचे गावात आगमन झाल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. सकाळी आळे गाव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ज्यांना जेजुरीला जाता येत नाही.त्यांनी काठीचे दर्शन घेतले, तळी भरून भंडारा खोबऱ्याची उधळण केली व देव भेट देखील केले यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. होलम काठी आगमनामुळे गावात अनेक ठिकाणी खाऊ चे दुकाने, खेळणी दुकाने, अनेक ठिकाणी हॉटेलमधे जिलेबी, भजी, गुडीशेव, रेवड्या, भेळ खाण्यासाठी खवय्याची गर्दी पहायला मिळाली.आळे गावातून मानाच्या काठीचे वाजता गाजत मिरवणूक काढण्यात येते. आळे येथील खालची माळी आळी येथील खंडोबा देवस्थान व आगर मळा येथून दोन मानाच्या काठ्या या गावात आणल्या जातात व तीनही काठ्याचे गावात मिरवणूक काढून सायंकाळी महाआरती झाल्यावर या काठ्या जेजुरीकडे प्रस्थान करतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे