विद्यानिकेतन च्या १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
1 min read
साकोरी दि.६:- विद्यानिकेतन पी एम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतन संकुलाचे अध्यक्ष पी.एम साळवे उपस्थित होते.
तसेच विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या रूपाली पवार तसेच उपप्राचार्य शरद गोरडे व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नववीच्या तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून उत्तम नियोजन केले. सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील ईश्वरी भोर आणि संस्कृती खराडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम दांगट याने केले. तसेच आभार प्रदर्शन ओम बारवनकर याने यांना मार्गदर्शन गाडगे छाया, शेवाळे प्रियांका, टाव्हरे वर्षा या शिक्षकांनी तसेच इतर शिक्षक वृंदांनी केले.
विद्यानिकेतन संपूर्ण चे अध्यक्ष पी.एम साळवे आणि प्राचार्य रमेश शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करून त्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या.
¿