माझ्या सखे, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग;संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द

1 min read

पुणे दि.५:- संत तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून ओळख असलेले शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून पाऊल उचलल्याचे कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. शिरीष महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. होणाऱ्या पत्नीला देखील शिरीष महाजारांनी चिठ्ठी लिहिली होती.शिरीष महाराज मोरेंनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले? याचं कारण महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये दडलं आहे. पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येमागचं कारणही समोर आलं आहे. माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना ही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे, पैकी कार विकून 7 लाख फिटतील.वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती शिरीष महाराज मोरेंनी मित्रांना केली आहे. मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली आहे. होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय. पण माझ्या सखे तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग. असं ही चिठ्ठीत नमूद केलेलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे