जुन्नर तहसील कार्यालयात शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर समन्वय बैठक संपन्न
1 min read
जुन्नर दि.५:- शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन शेतकऱ्यांना शेतरस्त्याचा अर्ज तयार करण्यापासून ते प्रशासकीय न्यायायलीन लढा अत्यंत वेळकाढू जीवघेणा बनला असुन अनेक शेतकऱ्यांनी शेतरस्त्याच्या प्रश्नामुळे जमिनी विकल्या काही फौजदारी स्वरूपाच्या घटनांमधे शेतकरी गुंतला आहे. शेतीसाठी शेतरस्ता शेतीचा श्वास असुन आधुनिक यंत्रसामुग्री शिवाय शेती करण शक्य नाही अशातच दिवसेंदिवस होत चाललेले विभाजन तुकडेवारी यामुळे रस्त्यांचा प्रश्न वाढत चालला असून तहसिलवर अनेक शेतरस्ता केसेस प्रलंबित ठेवल्या जावून यातून आर्थिक तडजोडीचे प्रकार समोर येत असुन.
पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांना बाजारात घेवून जान तर दूरच शेतातच शेतमालाच नुकसान झालेल्या घटना वाढत चालल्यामुळे महराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शासननिर्णयाची अंमलबजावनी करून घेण्यासाठी व शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळून देण्यासाठी
राज्यव्यापी आंदोलन उभारून जिल्हा तालुका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यातच शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांची जुन्नर तहसिलवर शेतकऱ्यां समवेत तालुका प्रशासना सोबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संदर्भात जुन्नर तहसिलवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार विस्ताराधिकारी भोईर, नायब तहसीलदार रासकर मॅडम , भूमी अभिलेख मधील मॅडम व पोलीस प्रशासन हे सर्व बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत तालुकास्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन बीडीओ साहेबांनी दिले. तसेच येत्या 25 तारखेला पुन्हा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्याचे तसेच दर पंधरा दिवसांनी किती काम झाले.
याची माहिती सुद्धा शेतकरी वर्गाला कळेल असं अश्वस्त करण्यात आले. जुन्नर तालुका शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे पदाधिकारी, तसेच विविध शेतकरी संघटनांचे नेते, व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.