महिला कीर्तनकार ह.भ.प रोहिणीताई गडकरी यांना “समाज भूषण ” पुरस्कारने केले सन्मानित

1 min read

आळेफाटा दि.५ :- नगर जिल्ह्य़ातील महिला कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. कु.रोहिणीताई गडकरी महाराज (रा. सुलतानपुर ता अकोले जि. अहिल्यानगर) यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी घारगाव याठिकाणी एका विवाह सोहळ्यात बेरड, बेडर रामोशी नोकरदार समिती महाराष्ट्र राज्य व तसेच जुन्नर तालुका रामोशी समाज बांधव ग्रुप यांना ” समाज भूषण ” पुरस्काराने गौरविण्यात येऊन त्यांना सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देण्यात आले.

यावेळी त्यांच्या मातोश्री बेबीताई गडकरी यांना देखील एक “कर्तबगार आई” म्हणून देखील शाल व श्रीफळ गौरवण्यात आले.त्यांचे सामाजिक कार्य, तसेच समाजाप्रति असणारी विचार धारणा यामुळे त्यांनी समाजात नाव लौकिक केला आहे.रामोशी समाजाच्या शैक्षणिक, वैचारिक आणी विशेषता सामाजिक कामात ज्या मान्यवर लोकांनी योगदान दिले.अशा लोकाना दरवर्षी त्याना हा ” समाज भूषण ” पुरस्कार दिला जात असतो.या कार्यक्रमाप्रसंगी दै.पेपरचे संपादक राजेंद्र गडकरी , गायत्री पतसंस्थेचे संचालक वसंत शिरतर, अशोक भंडलकर, सुरेश शिरतर , सामाजिक कार्यकर्ते, टी.व्ही.९ चे पत्रकार, जयवंत शिरतर तसेच पत्रकार सुदर्शन मंडले आदी उपस्थित होते.निवड झालेल्या सन्माननीय पुरस्कारप्राप्त व्यक्तीचे सर्वाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे