पिंपळवंडीत जुगार अड्डयावर छापा: २१ जण ताब्यात; १ लाख ३० हजार ६५० रुपये रोकडसह मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कारवाई

1 min read

पिंपळवंडी दि.५:- जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळवंडी गावच्या अभंग वस्ती येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळणाऱ्या २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आळेफाटा पोलिसांनी तब्बल १ लाख ३० हजार ६५० रोख रक्कमसह तेथील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अधिक माहिती मिळाली की, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळवंडी गावच्या हद्दीत बस स्टॅन्डजवळ अभंगवस्ती कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या पत्राशेडमध्ये न्यू महाराजा प्लेइंग कार्ड बोर्ड लावलेल्या पत्रशेडच्या आत जुगार चालू असल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली.त्यांनी घटनास्थळी भेट असता. तेथे २१ लोक जुगार खेळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे एकूण १ लाख ३० हजार ६५० रुपये रोख, डी. व्ही. आर बॉक्स, क्वाईन वर लावलेली रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या एकूण २१ लोकांवर कारवाई केली असून

त्यांची नावे खालीलप्रमाणे :- मारुती बबन गुंजाळ( वय ४२रा.आळे ता. जुन्नर) राजेंद्र बाळासाहेब माळवी (वय ४७रा.घोडेगाव,ता. आंबेगाव) सतीश रखमाजी हांडे( वय ३६,रा.पिंपळगाव जोगा ता. जुन्नर )गणेश लिंबाजी किचमे (वय. ३९,रा.नारायणगाव ता. जुन्नर) दत्ता यादव कुऱ्हाडे (वय ५०,रा आळे ता.जुन्नर), रेवन सिताराम तळपे (वय३९,बोटा ता संगमनेर जि अहिल्यानगर ), किशोर कैलास शिरतर (वय २८, रा आळे, ता जुन्नर )कैलास तुकाराम शिरतर (वय ५०, रा. आळे ता जुन्नर ), सूरज तानाजी जाधव (वय २३, आळेफाटा ता. जुन्नर ),अशोक कोंडीबा भोर (वय ६४, रा काळवाडी ता. जुन्नर ), सचिन भिमाजी गोफणे (वय ३३, रा आळे ता. जुन्नर ), खंडू रामभाऊ पवार (वय ६४, रा. नारायणगाव ता जुन्नर ), सचिन पोपट काकडे (वय ४५, रा पिंपळवंडी ता. जुन्नर ), प्रकाश बबन काकडे (वय ५०, रा पिंपळवंडी ता. जुन्नर ), राजेंद्र विठ्ठल काळे (वय ४२, रा. पिंपळवंडी ता. जुन्नर ), राजेश रमेश सस्ते (वय ३०,रा. पिंपळगाव जोगा ता. जुन्नर ), महेश नानासाहेब शेळके (वय ३४, रा. बोटा, जि. अहिल्यानगर ), अनिल गोरख पटाडे (वय ४२, रा बोरी, ता. जुन्नर ), गणेश कारभारी गाडगे (वय ४६, रा बोरी, ता. जुन्नर ), सोमनाथ सुदाम भुजबळ (वय. ३६रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर ),विश्वनाथ बबन फावडे (वय ४०, रा. बेल्हे, ता. जुन्नर )

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे