बॉम्बची अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हा

1 min read

शिक्रापूर दि.४:- तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे बॉम स्फोट होऊन चार नागरिक जखमी झाल्याबाबतचा खोटा फोन करुन पोलिसांना त्रास देणाऱ्या अज्ञात इसमावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप (वय ३३ रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कामात असताना अचानक ११२ क्रमांकावर तळेगाव ढमढेरे येथे श्री हनुमान स्टोअर मध्ये बॉम स्फोट होऊन चारजण जखमी झाले असल्याबाबतचा एका नागरिकाने फोन केला. त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलीस हवलदार किशोर तेलंग, संदीप इथापे, प्रतिक जगताप, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांसह आदींनी तळेगाव ढमढेरे गावामध्ये अनेक ठिकाणी फिरुन माहिती घेतली असताना कोठेही स्फोट झाला नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सदर फोन करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन केला असता फोन देखील बंद लागू लागला. त्यांनतर सदर फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना त्रास देण्याच्या हेतूने बनावट फोन केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी याबाबतची माहिती पोलीस मुख्यालय येथे कळवली. याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे