चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित

1 min read

जुन्नर दि.४:- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर निदर्शने/ठिय्या आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांमध्ये मागण्या मान्य करण्यात येतील व पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.असे श्री विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर आज आंदोलन करण्यात आले आंदोलनाला सुरुवात होताच कारखान्याची चेअरमन सत्यशील शेरकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यावर्षीच्या गाळप हंगामासाठी ३१०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी होती याबाबत चेअरमन आणि कारखान्याचे एमडी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले पुणे जिल्ह्यामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दिलेला भाव २६२० रुपये हा खूपच कमी आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दिलेला दर लक्षात घेऊन आपण चांगला दर शेतकऱ्यांना द्यावा. ही बाब कारखान्याची चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मान्य केली. लवकरात लवकर कारखान्याच्या संचालक मंडळाची मीटिंग बोलून याबाबत सकारात्मक चर्चा करून निश्चितपणाने आपली मागणी मान्य करून इतर कारखान्याच्या तुलनेत चांगला भाव शेतकऱ्यांना देण्याचे त्यांनी मान्य केले तोपर्यंत आपण आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती चेअरमन यांनी केली. यावेळी प्रभाकर बांगर म्हणाले आपण या वेळेला सकारात्मक निर्णय घेऊन चांगला बाजार भाव शेतकऱ्यांना दिला नाही तर मात्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका प्रतिनिधी प्रमोद खांडगे पाटील यांनी दिली. यावेळी तुकाराम गावडे, संजय पालेकर, मंगेश बोऱ्हाडे, वैभव राक्षे, चंद्रकांत भिसे, वैभव भिसे,संतोष शिंदे, नवनाथ भांबेरे, खुशाल शिंदे, गणेश भिसे, पंकज भिसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे