श्री रोकडेश्वर ज्वेलर्स मध्ये रंगला हळदी-कुंकू समारंभ

1 min read

आळेफाटा दि.३:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील श्री रोकडेश्वर ज्वेलर्स येथे तालुक्यातील महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सुमारे साडेसहाशे ते सातशे महिला सहभागी झाल्या होत्या. रविवार दिनांक २ रोजी सायंकाळी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. उपस्थित महिलांना ज्वेलर्स च्या वतीने वाणाचे वाटप करण्यात आले. दरवर्षी नियमितपणे श्री रोकडेश्वर ज्वेलर्सच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. पैजन व जोडवी महोत्सव, सर्व ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात येत असते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे