नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात; बस २०० फूट दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू; १५ जण जखमी

1 min read

नाशिक दि.२:- नाशिक-गुजरात महामार्गावर खासगी लक्झरी बसचा आज रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात खासगी बस दरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जमखींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून देवदर्शन करुन गुजरातकडे देवदर्शनासाठी भाविक जात असताना बसला अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बस थेट 200 फूट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावर पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे