रक्तदान शिबिराने ‘विशाल फार्मोत्सवा’ ला उत्साहात सुरुवात
1 min read
आळे दि.३०:- दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विशाल जुन्नर सेवा मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वूमन आणि विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा. एज्यु. अँड रिसर्च, आळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या “विशाल फार्मोत्सव” निमित्त सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि आरोग्यसेवेच्या उद्देशाने ‘विशाल फार्मोत्सव’ ची सुरुवात माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून रक्तदान शिबिराने करण्यात आली. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शरद लेंडे, मा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद, डॉ.जीवन राठोड, पुना ब्लड सेंटर, अंकुश सोनावणे, अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ, अशोक सोनवणे, मा.अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ, वसंत पाडेकर, संचालक विशाल जुन्नर सेवा मंडळ, विक्रांत काळे, संचालक, विशाल जुन्नर सेवा मंडळ या मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तसेच संस्थेचे सीईओ डॉ. दुष्यंत गायकवाड, तिन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, प्राचार्या डॉ. रुपाली हांडे,प्राचार्या डॉ. अनुराधा ताजवे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक व्यक्तीने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मिळून ८६ बॅग्सचे संकलन झाले.विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘विशाल फार्मोत्सवा’चे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अश्लेषा चिंचवडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.