सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1 min read
राजुरी दि.१४:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्कूलचे प्राचार्य अमोल जगदाळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्राचार्य अमोल जगदाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.