“रंगोत्सव सेलिब्रेशन” अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या ११ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

1 min read

बेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस ई शाळेतील एकूण ११ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली. “रंगोत्सव सेलिब्रेशन” या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत दैदीप्यमान कामगिरी बजावली.

इ.९ वी मध्ये शिकत असलेली सानिका मेहेर हिने हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक तर ६ वी तील सरी आहेर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.इ.७ वी तील सृजन शेलार या विद्यार्थ्याने टॅटू मेकिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.स्कुल बॅग आणि प्रशस्तिपत्रक देऊन त्याला गौरविण्यात आले.

इ.१० वी तील वैष्णवी ढोबळे व इ. ३ री तील श्रीनिका शेळके यांना उत्कृष्ट परफॉर्मन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.किमया आरोटे,साहस वैद्य,श्रीनिका शेळके,प्रणव बांगर,समृद्धी शेळके या विद्यार्थ्यांना रंगभरण स्पर्धेमध्ये तर प्रिया राजदेव हिला टॅटू मेकिंग स्पर्धेत उदयोन्मुख बाल कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सुवर्णपदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.संतोष घुले,डॉ.बसवराज हातपक्की,डॉ.उत्तम शेलार डॉ.शिरीष गवळी,प्रा.अनिल कपिले,प्राचार्य पांडुरंग हाडवळे,प्रा.वैशाली आहेर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षिका दिप्ती चव्हाण यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे