इंदिरानगर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

1 min read

बेल्हे दि.२७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर या शाळेमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बेल्हे गावचे विद्यमान उपसरपंच राजू पिंगट, अनन्या तपासे प्रदीप पिंगट, नाजीम बेपारी, कैलास आरोटे, सागर लामखडे, ठका शिंदे, सुधाकर सैद, किसन देशमुख, नानाभाऊ खुडे, उषा खुडे,

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच राज्यघटनेला अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झाल्या मुळे भारताची राज्यघटना या पुस्तकाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर केंद्र पातळीवर तृतीय क्रमांक लोकनृत्य स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना साई माऊली सेवा ट्रस्ट विसावा चौक बेल्हे या ट्रस्ट मार्फत ट्रॉफी देण्यात आली.

केंद्र पातळी प्रथम, बीट पातळी प्रथम, व तालुका पातळी द्वितीय क्रमांक 50 मीटर धावणे या स्पर्धेत तेजस सोमनाथ जेडगुले याचा विशेष सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव निमित्त पाढे पाठांतर इंग्रजी स्पेलिंग पाठांतर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना श्री साई माऊली सेवा ट्रस्ट बेल्हे या ट्रस्टचे अध्यक्ष राजू गफले,

उपाध्यक्ष शरद भंडलकर आणि सचिव सुधाकर सैद पत्रकार यांचेमार्फत ट्रॉफी चे वितरण करण्यात आले. यानंतर अंगणवाडीतील मुलांची सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. अंगणवाडी कार्यकर्ती कांता पिंगट व सुप्रिया पिंगट, रेखा देशमुख, सतीश पवार, सुरेश गुंजाळ, राजू घोलप यांनी नियोजन आणि सहकार्य लाभले.

त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे लोकनृत्य मुकाभिनय लावणी पोवाडे सादरीकरण करण्यात आले सर्व विद्यार्थी व सर्व पालक यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना रोख बक्षीस दिली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण गुंजाळ, उपाध्यक्ष अंजुम शेख, नितीन गोफने, रितेश देशमुख, कोमल पिंगट, पूजा अल्पेश सोनवणे,

मोनिका प्रतिक वाघचौरे सारिका काळे, शितल बाबाजी खोमणे, आरती गुंजाळ, उमेश शिरसाट, अल्पेश सोनवणे स्वप्निल शरद खोल्लम, रोहीदास विसावे प्रकाश सोनवणे सचिन बेलकर, पूनम विसावे, सविता भंडलकर, जयश्री रविंद्र डुंबरे, फिरोज शेख, सलमा शेख जुबेर शेख शारदाताई शिंदे जयश्री गुंजाळ मंगल बाळू बोऱ्हाडे, रोहिणी सोमनाथ जेडगुले मन्सूर बेपारी

सायरा बेपारी सईदा कुरेशी शबाना कुरेशी अनिता फुलमाळी जवार बेगम रुबाब शेख , हर्षदा दरवेशी मुकंदर शेख, आदी सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती हाडवळे व पुष्पा गुंजाळ केलें. या सर्व गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अंजुम शेख यांनी केले.

सर्व पालकांनी भरभरून सहकार्य व आर्थिक मदत केली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पालकांना स्नेहभोजन देण्यात आले. पाणी सौजन्य संतोष चाटे यांचे लाभले उपस्थित सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आभार अल्पेश सोनवणे व नानाभाऊ खुडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे