पुणे हादरलं! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार

1 min read

पुणे दि.२६:- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात पहाटेच्या सुमारास फलटण येथे जाण्यास निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पुण्यात खरचं महिला सुरक्षित आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, अंदाजे, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एकटी तिच्या गावी जाण्यासाठी निघाली होती. ती स्वारगेट बसस्थानकात गेली होती.

यावेळी ती एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने घेत तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. यानंतर आरोपी फरार झाला. पीडित २६ वर्षीय तरुणी ही स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या एका शिवशाही बसजवळ गेली. तिला तिच्या गावी जायचे होते.

यावेळी पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तिच्यावर बलात्कार केला अन् पळ काढला. तरुणी ही पहाटे ५.३० वाजता पुण्यातून फलटणच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका ठिकाणी थांबलेल्या असलेल्या एका शिवशाही बसजवळ गेली.

त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. यावेळी आरोपीने तिला तिकडे जाण्यास सांगितलं.

यावर तरुणीने आरोपीला माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असे सांगितले. तसेच ही एसटी तर बंद आहे असं देखील तरुणीने सांगितलं. यावेळी आरोपीने तरुणीला तू टॉर्च लावून आत मध्ये जा ही एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं सांगितले.

तरुणी बसमध्ये शिरताच आरोपी देखील बसमध्ये शिरला व त्याने तरुणीवर बलात्कार केला. यानंतर आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, आरोपीने एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात आप बिती सांगितली.

या घटनेची द स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यामध्ये आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे