३ लाख मुंबईकरांना तब्बल १० हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या सीईओला अखेर अटक
1 min read
मुंबई दि.२७:- ३ लाख मुंबईकरांना तब्बल १० हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या सीईओला अखेर अटक करण्यात आली आहे. टोरेस पॉन्झी घोटाळ्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस घोटाळ्यातील फरार आरोपी तौसिफ रियाझला अटक केली.तौसिफ रियाझ हा टोरेस कंपनीचा सीईओ आहे. काही दिवसांपूर्वी तौसिफने स्वत:ला व्हिसल ब्लोअर असल्याचे सांगत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणखी एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.तौसिफ रियाझ टोरेस हा देखील कंपनीचा सीईओ असून हे घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यापासून तो फरार होता.
तौसिफने दावा केला की, जेव्हा त्याला या घोटाळ्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांसमोर ठेवले होते. आपण आरोपींसोबत नसून त्यांच्या विरोधात असल्याचा दावा त्याने केला होता. तौसिफ रियाझ हा बिहारचा असल्याचे बोलले जात आहे. तो बिहारच्या सुलतानगंजमधील भागलपूरचा रहिवासी आहे.
त्याला अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सुलतानगंजमध्ये छापा टाकला होता. त्याच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. भागलपूर शहरातील त्याच्या नातेवाईकांच्या घरावर आणि सुलतानगंजमधील तौसिफच्या वडिलोपार्जित घरावरही पोलिसांनी छापे टाकले होते.