भारत वाचनालय व ग्रंथालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात संपन्न

1 min read

राजुरी दि.२४:- वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी, नवी पिढी वाचणाकडे वळावी, मोबाईल पासून थोडं दूर रहावे याकरिता भारत वाचनालंय वा ग्रंथालय ग्रामपंचायत राजुरी यांचेतर्फे वाचन सकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांर्तगत वाचन कौशल्य कार्यशाळा, समूहवाचन व ग्रंथप्रदर्शन इ. कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.दर कार्यक्रमात आयोजित केलेल्या वक्तृक्त स्पर्धेत सुमारे 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी छोटा गट – प्रथम क्रमांक आरती सचिन माकरे, द्वितीय हर्षवर्धन निलेश गटकळ , तिसरा क्रमांक आसावरी ज्ञानेश्वर कर्डीले मोठा गट – प्रथम क्रमांक साहिल विकास शिंदे, द्वितीय क्रमांक कृष्णा कैलास काळे, तृतीय क्रमांक गनंजय विनायक वाळनकर व समर्थ पांडुरंग शिंदे यांचा आला. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली व सहभागी विद्यार्थी यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले. वाचनालयाने आयोजित केलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम असून त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये वाचनसंस्कृती वाढून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल असे मत उपसरपंच माऊली शेळके यांनी व्यक्त केली.सदर कार्यक्रमास राजुरी गावाचे सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, ग्रामपंचायत सदस्य एम डी घंगाळे, एकनाथ शिंदे, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, शाकीर चौगुले, गौरव घंगाळे, चंद्रकांत जाधव, सुप्रिया औटी, मीना आवटे, शीतल हाडवळे, निर्मला हाडवळे, सुवर्णा गटकळ, राजश्री रायकर, किशोरी औटी, रुपाली औटी ग्रामपंचायत अधिकारी संदीप ढोरे, ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल सारिका गटकळ यांनी केले नियोजन सपना चव्हाण यांनी केले तर आभार सागर डवले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे