निमगाव सावा येथे छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
1 min read
निमगाव सावा दि.२४:-१४४ वर्षांनी आलेल्या कुंभमेळ्याचे विशेष पर्व व आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर वर्धापन दिन, अनेक कलगी -तुरा शाहिराचा मेळावा तसेच शाहिरी संघ १८ वा वर्धापन दिन निमीत्त निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे शाहिराचा मेळावा घेण्यात आला.तसेच छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी कलगी – तुरा वाले शाहीर रामदास गुंड आणि पार्टी व स्वप्नील गायकवाड आणि पार्टी,
तानाजी माळवदकर आणि पार्टी, ठकसेन शिंदे आणि पार्टी, सोमनाथ काळे आणि पार्टी, अनेक कलगी -तुरा पार्ट्यानी सहभाग घेतला होता. कार्यक्रमांचे दिप प्रज्वलन माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व हभप बबन महाराज डुकरे औरंगपुर यांनी केले व अन्नदान धर्मा गाडगे, श्रीरंग गाडगे, माऊली गाडगे, चंद्रकांत जावळे, सुवर्ण कलेक्शन पोपट पाबळे, हभप विठ्ठल महाराज घोडे यांनी अन्नदान दिले. कार्यक्रमाचे आयोजन हभप विजय महाराज खाडे, सुनिल गाडगे, गणेश गाडगे होमगार्ड यांनी केले.