भंडारामधील आयुध निर्माण कंपनीत भीषण स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू
1 min read
भंडारा दि.२४:- भंडाऱ्यामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. स्फोटाने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या मदतकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे.या भीषण स्फोटाने आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
तर स्फोटाची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.