काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी संदीप गंभीर

1 min read

खामुंडी दि.२३:- जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संदीप गंभीर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली. देवस्थान ट्रस्टच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी देवस्थान ट्रस्टच्या उपाध्यक्षपदी जयराम डुंबरे, कार्याध्यक्ष भास्कर शिंगोटे, सचिवपदी मारुती शिंगोटे, सह सचिवपदी दत्तात्रय खोकराळे, खजिनदारपदी मारुती कदम विश्वस्त अमोल शिंगोटे उपेंद्र डुंबरे,शहाजी जाधव,विश्वजीत डुंबरे,सुभाष बोडके,गणपत कोकाटे,गणेश डुंबरे,मनोज डुंबरे, शांताराम बोडके, अरुण बोडके,रवींद्र शिंगोटे, उज्वल शिंगोटे राजेंद्र वारुळे,संतोष भालेराव यांनी एक मताने ही बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. देवस्थानचे मावळते अध्यक्ष मारुती शिंगोटे व नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप गंभीर आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. खामुंडी येथील काळभैरवनाथ मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला.या मंदिराचे बांधकाम भव्यदिव्य, विलोभनीय, कलाकुसरीचे करण्यात आले आहे. हे काम सर्व ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागातून करण्यात आले असून माजी ट्रस्टचे पदाधिकारी व नूतन अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचाही मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्यात मोठा वाटा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे