दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात

1 min read

रानमळा दि.१९:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगावसावा (ता.जुन्नर) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१८ रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता खोमणे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष शहनाज इनामदार, रानमळा सुरेश तिकोणे, सरपंच गुंजाळवाडी नयना गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते शांताराम लामखडे, ग्रामपंचायत सदस्य बेल्हे आप्पा मुलमुले, ग्रामपंचायत सदस्य बेल्हे समीर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रामदास गुंजाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाभाऊ गुंजाळ, ठकाजी राघू जाधव, राम जिजाबा गुंजाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी ज्योती गायकवाड, सह अधिकारी प्रविण गोरडे, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग व रा. से. यो. स्वयंसेवक उपस्थित होते.उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी सत्यवादी असणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देताना त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या विचारांची व आचरणाची कास धरून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना शुद्ध हेतू ठेवून करावे जीवनात तुम्हाला त्याचे फळ निश्चित मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.बेल्हे गावचे समाजसेवक डॉ.दत्ता खोमणे यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त पाळून राष्ट्रीय सेवा योजनेचा आपल्या जीवनामध्ये लाभ घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेची मूलभूत तत्वे आणि त्यांचा अंगीकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात निश्चित यश प्राप्त होईल राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांस जीवन मूल्य व नीती मूल्य शिकवते. या सर्व विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन विद्यार्थ्यांनी वर्तन करावे जीवनात यशस्वी व्हावे असे विचार त्यांनी व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगून विद्यार्थी आणि ग्रामस्थांची विशेष श्रमसंस्कार शिबिरातील भूमिका स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू उद्देश व ग्रामविकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शेहनाज इनामदार, तसेच सदस्य ग्रामपंचायत बेल्हे आप्पा मुलमुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी भोर, प्रा. पुनम पाटे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. सुभाष घोडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे