सह्याद्री व्हॅली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन 

1 min read

वडगाव दि.१८:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग राजुरी आणि ग्रामपंचायत वडगाव व कांदळी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन वडगाव कांदळी गावचा प्रथम नागरिक सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

महारिया चारिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्ह्याली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी यांचे खजिनदार सचिन चव्हाण या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

वडगाव कांदळी च्या सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते उद्घाटन समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे बोधवाक्य मनावरती कोरून लोकशाही आणि सामाजिक बांधिलकी जपावी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम

करणारे स्वयंसेवक समाजाची निस्वार्थ सेवा करून आपल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी करतील असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी गावाचे उपसरपंच संजय खेडकर यांनीही आपल्या मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवकांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. बलाराम यांनी राष्ट्रीय सेवेबरोबर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गावांमध्ये नवीन योजना राबवाव्यात असे आवाहन विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना केले

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक उद्धव भारती यांनी शिबिराची रूपरेषा सांगून महाविद्यालयाचे स्वयंसेवक, ग्राम स्वच्छता, अभियान नेत्र तपासणी शिबिर, महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच युथ फॉर माय भारत, युथ फॉर डिजिटल लिटरसी, गड संवर्धन असे विविध कार्यक्रम गावामध्ये घेणार आहेत असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गावच्या सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर, महाविद्यालयाचे खजिनदार सचिन चव्हाण सर आणि उपप्राचार्य पी. बलराम ग्राम पंचायत सदस्य रामदास पवार, पंढरीनाथ पाचपुते, सुवर्ण मुटके, सौदा पठाण, शुभांगी निलक, जिजाभाऊ भोर, संगीता भोर, सुजाता लांडगे, सचिन दादाभाऊ निलक

सदस्य माननीय चेअरमन बिरोबा पतसंस्था वडगाव कांदळी हिंदमाता महाविद्यालयाचे प्राचार्य डेंगळे बिडी, दिनकर हांडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद वडगाव कांदळी, संदेश गणपत पाचपुते चेअरमन दुग्ध संस्था, श्रीकांत पाचपुते प्राध्यापक चेअरमन साई लक्ष्मी पतसंस्था, ज्ञानेश्वर नाथा निलख, बबन भिमाची लांडगे, बाळासाहेब पाचपुते पोलीस पाटील वडगाव कांदळी,

संजय मुटके चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी शरद पाचपुते माझी उपसरपंच वडगाव कांदळी जालिंदर सानप वनाधिकारी आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उद्धव भारती यांनी केले. तर आभार प्राध्यापक कविता खेमनर यांनी मांडले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व राष्ट्रीय सेवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे