बीड पुन्हा हादरलं; दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या; तिसरा भाऊ गंभीर जखमी; ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात
1 min read
बीड दि.१७:- बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.आष्टी तालुक्यात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. हत्ये मागचे कारण अस्पष्ट आहे. बीड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. नातेवाईकानेच दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांच्या हत्या झाली.
दोघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे आहेत. याच गावापासून 5 किलोमीटर अंतरावर वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहा वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही गंभीर घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.
आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.
रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली 4 संशयितांना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.