बाबीतमळा ओतूर येथे हल्ला करणारा बिबट पकडण्यास वन विभागाला यश
1 min read
ओतूर दि.१५:- वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे बाबीतमळा ओतूर श्री कपर्दीकेश्वर मंदिराच्या पाठीमागे पिंपळगाव जोगे कालव्याच्या शेजारी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पंधरा दिवसापूर्वी वनविभागाने लावण्यात आलेल्या पिंजरामध्ये बिबट वन्यप्राणी नर १ अडकून जेर बंद झाला आहे. सदरचा बिबट हा मंगळवार पहाटे अंदाजे ६:३० सुमारास जेर बंद झाला असून त्याचे वय अंदाजे ७ वर्षे असावे, सदरची माहिती कळताच तात्काळ सारिका बुट्टे वनपाल ओतूर, विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर, दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव,
प्रदीप तांबे सदर ठिकाणी पोहोचून पाहणी करून सदर बिबट्यास माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. या कामी मनोहर जाधव, गणेश खंडागळे, पोपट मालकर, तुकाराम गीते, सुरत सावंत, वैभव अस्वार, गणेश गीते, रमेश गीते, संदीप गीते, दीपक घुले, संपत पानसरे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.
ग्रामस्थांनी रात्री अपरात्री फिरत असताना व तसेच कामे करत असताना स्वतःची काळजी घेऊन कामे करावी, बिबट प्रवणक्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना जात असताना आपल्या वाहनाचे हॉर्न मोठाने वाजवावे रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी जेणेकरून त्यांची जागा बदलतील व आपले स्वतःचे संरक्षण होईल.
शाळेतील लहान मुले शाळेत ये-जा करताना घोळक्याने ये-जा करावे किंवा आपल्या पाल्यासोबत ये-जा करावे. असे कळकळीचे आवाहन वन विभाग जुन्नर यांच्याकडून करण्यात येत आहे.