समर्थ शैक्षणिक संकुलात राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न

1 min read

बेल्हे दि.१५:- भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पद जिंकून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होत असताना समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये या प्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्य क्रीडा दिनानिमित्त समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.त्यामध्ये ॲथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. यशस्वी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. खाशाबा जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कुस्तीगीर होते. आणि १९५२ च्या हेलसिंकी स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला कुस्ती या खेळामध्ये पहिले वैयक्तिक पदक ब्राँझ पदकाच्या रूपाने प्राप्त करून दिले. हेलसिंकी, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चित्तपट करण्याची किमया दाखवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढलेले खशाबा जाधव याप्रती समर्पित भावनेने कार्यरत राहिले, प्रसंगी निधी जमा केला. शासनाची काही मदत घेतली आणि हेलसिंकी या ठिकाणी ऑलिंपिकला पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी यश मिळवून दाखवलं. हे सर्व खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक प्रा.हरिश्चंद्र नरसुडे यांनी सांगितले. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन क्रीडा संचालक क्रीडा शिक्षक व सर्व प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले, बीसीएसचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, समर्थ पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.ईश्वर कोरडे यांची उपस्थिती होती. क्रीडा शिक्षक सुरेश काकडे व मोनिका चव्हाण यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी झाल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे