व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींचा रायफल शूटिंग स्पर्धेत अप्रतिम विजय
1 min read
नगदवाडी दि.११:- पिंपरी चिंचवड- पुणे येथे “भारतीय सैन्य दिनाच्या” निमित्ताने आयोजित १० मीटर ओपन साईट एअर रायफल स्पर्धेत, विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थिनींनी नेत्र दीपक कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले आहे.
या खेळाडूंनी आपली कौशल्य, परिश्रम आणि जिद्द सिद्ध करत स्पर्धेतील विविध गटांमध्ये पदके जिंकली आहेत. इयत्ता १० वी मधील इशिता किशोर काकडे हिने १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
इयत्ता ८ वी मधील ज्ञानेश्वरी प्रविण पटाडे हिने १४ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले आहे. तसेच इयत्ता ८ वी मधील वेदिका विलास अभंग हिने १४ वर्षांखालील गटात कांस्यपदक जिंकले आहे.
कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यांच्या जोरावर या विद्यार्थिनींनी परिपूर्ण प्रदर्शन केले. मिळालेल्या सुवर्णसंधीचं निश्चितच या विद्यार्थिनींनी सोनं केलंआहे; यात तीळ मात्र शंका नाही.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक केले व त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी. ई. ओ दुष्यंत गायकवाड यांनीही यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा ही दिल्या.