घरफोडी करणाऱ्या चौघांना मंचर पोलिसांनी केली अटक; १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

मंचर दि.११:- मंचर (ता.आंबेगाव) घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना मंचर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या बाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती असली की, मंचर (जिल्हा पुणे) येथे एस कॉर्नर येथील

लक्ष्मीपूजन सोसायटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन बंद फ्लॅट फोडून 3 लाख 92 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व

3 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 72 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला असल्याचे मंचर येथे लक्ष्मण अरुण दातखिळे वय 30 वर्ष राहणार एस कॉर्नर मंचर तालुका आंबेगाव,

जिल्हा पुणे यांनी मंचर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सदरच्या गुन्ह्या करिता तपास पथकांची नेमणूक केली असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व

त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी गुन्ह्याच्या तपास करत असताना सदरचा गुन्हा मध्य प्रदेश येथील आरोपींनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दिनांक 29 /12 /2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे तपास पथकातील पोलीस कर्मचारी गुन्ह्याचा तपास असताना चोरी करणारे गुन्ह्यातील आरोपी

हे त्यांचे कडे स्विफ्ट कार एम. एच. 13 झेड. डी. 7856 मधून खेड मार्गे भीमाशंकर येथे जात असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर व त्यांचे टीमला माहिती मिळाल्याने सहा पोलीस निरीक्षक बडगुजर यांचे टीमने सीताफिने स्विफ्ट कार नंबर एम. एच. 13 झेड.डी. 78 56 आरोपींना पकडून ताब्यात घेतले

व आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) अलमसिंह ईस्तो बामनिया वय 31 वर्ष राहणार करचट, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश २) अवलसिंग रामसिंग भुरिया वय 50 वर्षे राहणार देवधा तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश ३)

चमसिंग बदरु बामनिया वय 29 वर्ष राहणार, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्येप्रदेश ४) करणसिंग कालूसिंग भुरिया वय 38 वर्ष राहणार धोडदल्या, तालुका कुक्षी, जिल्हा धार, मध्यप्रदेश असे असल्याचे सांगितले व सदर घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींना अटक करून

न्यायालयात हजर करून १० दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला आहे. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अटक आरोपींनी खालील गुन्हे केल्याचे उघडे झाले आहे.

सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मध्य प्रदेश येथे ठेवली असल्याचे अटक आरोपींनी सांगितल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व त्यांचे सोबतचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय नाडेकर,

पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, यांनी आरोपी सह मध्यप्रदेश येथे जाऊन आरोपीकडून ८ लाख २० हजार ४७९ रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली

५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण १३ लाख २० हजार ४७९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे,

पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार नंदकुमार आढारी,

पोलीस हवालदार प्रणय कुमार उकिरडे, पोलीस हवालदार शरद कुलवडे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, पोलीस अंमलदार सुनील काठे, पोलिस अंमलदार प्रवीण गर्जे,

पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार लखन माने यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे