राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात एकदिवस जिल्हास्तरीय कार्यशाळा

1 min read

निमगाव सावा दि.११:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पर्यावरण या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय मूल्यशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, विद्यापीठ गीत, एनएसएस गीताने झाली. पर्यावरण मूल्यशिक्षण कार्य शाळेसाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. डॉ. गुलाबराव पारखे बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना झाडे लावा. व ती जगण्यासाठी योगदान द्या निसर्ग वाचला तर माणूस वाचेल असे विचार मांडले त्याचबरोबर प्रा. डॉ. गणेश सोनवणे पद्ममनी जैन कॉलेज पाबळ यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धनाचे धरू या कास निरोगी जीवन होईल हमखास जय पर्यावरण असे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गायकवाड जे.एस. यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मनुष्याला श्वास देऊन त्याच्या जीवनात जास्त उजेड निर्माण करण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते म्हणजे झाड असे मार्गदर्शन केले. सह. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गोरडे सर यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गायकवाड नीलम यांनी केले तसेच प्रास्ताविक प्रा. गायकवाड ज्योती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले. प्रा.घोडे सर यांनी आभार मानले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे सर तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी तसेच बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव, सीताबाई रंगुजी महाविद्यालय बोरी, पद्म मनी जैन महाविद्यालय पाबळ, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे