कोरठण देवस्थानच्या भक्तांच्या भावनेला ठेच पोचवण्याचा होतोय प्रयत्न:- अध्यक्षा शालिनी घुले
1 min read
पारनेर दि.७:-कोरठण खंडोबा देवस्थान हे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थान आहे. देवस्थान आज विकासाच्या माध्यमातून प्रगती साधत असून समाजातील काही समाजकंटक हे देवस्थानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत देवस्थानची होणारी बदनामी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असे स्पष्ट मत देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.राज्यातील भाविक भक्तांचे कुलदैवत असलेले पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव येत्या १३ जानेवारीला सुरू होत आहे.
कोरठण खंडोबा देवस्थान हे महाराष्ट्रात नावारूपास आलेले देवस्थान म्हणून ओळखले जात आहे.आंबेगाव,जुन्नर, संगमनेर, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा, शिरूर या चहुबाजूने येण्यासाठी येथे रस्ते आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्त यात्रा उत्सव काळात व इतर वेळेस सुद्धा देवदर्शनासाठी येत असतात.
कोरोना नंतर गेल्या तीन वर्षापासून यात्रा उत्सव नियोजनबद्ध भरत आहे विश्वस्त मंडळ चांगले काम करत असून देवस्थान विकासासाठी राज्य सरकार केंद्र सरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा निधी मिळविला आहे.
‘ ब’ वर्ग तीर्थक्षेत्र देवस्थान असल्याने विकास कामे मोठ्या प्रमाणात विश्वस्त मंडळांनी मार्गी लावली आहेत. पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान सारखी ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या ठिकाणी भाविक भक्तांची यात्रा उत्सव काळात मोठी गर्दी होत असते.
हा देवस्थान विश्वस्त मंडळांनी सर्वानुमती निर्णय घेऊन गेल्या एक दीड वर्षांपूर्वी देवस्थान मंदिराचा विकासात्मक जीर्णोद्धार केला परंतु समाजामधील काही समाजकंटक हे समाजामध्ये चुकीच्या अफवा पसरवून भाविक भक्त व लोकांना मध्ये चुकीचा संदेश देत आहेत.
त्यामुळे कोरठण खंडोबा भक्तांचे व पिंपळगाव रोठा गावकऱ्यांची भावनेला ठेस पोचत आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा योग्य ती भूमिका देवस्थान विश्वस्त मंडळ आता घेतल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मतच कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले यांनी व्यक्त केले आहे.