बेल्ह्यात जलजीवन च्या २ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन
1 min read
बेल्हे दि.३:- बेल्हे गावातील नागरीकांना मुबलक आणि पुरेशा दाबाने व स्वच्छ पिण्याचे पाणी प्राधान्याने उपलब्ध होण्यासाठी बेल्हे (ता.जुन्नर) येथे २ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन लोकनियक्त सरपंच मनीषा डावखर यांच्या हस्ते बुधवारी (दि.१) करण्यात आले.बेल्हे गावास बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाईप लाईनव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून यापूर्वी बांधलेली पाण्याच्या टाकीची बांधकाम मुदत संपल्याने व खुपच जीर्ण झाल्याने पाण्याची साठवणूक व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा योग्य पध्दतीने होत नव्हता.
तसेच येथील वाढती लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी वारंवार गावक-यांनी केली होती. या मागणीचा विचार करुन बेल्हे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या जलजीवन योजनेअंतर्गत २ लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम मंजूर करण्यात आले.
असून, त्याचे भूमिपूजन नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके, सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानकू डावखर, माजी सरपंच पाराजी बोरचटे, अशोक गुंजाळ, विश्वनाथ डावखर, माजी उपसरपंच निलेश कणसे,
ज्येष्ठ समाजसेवक अशोक घोडके, मारुती गुंजाळ, प्रदीप पिंगट, युवा सेनेचे मयुर गुंजाळ, निवृत्ती गटकळ, सागर लामखडे, बबन औटी, सुरेश गुंजाळ, राजेंद्र गाडगे, अशोक शिरतर, नाथा सावंत, स्वप्निल भंडारी, कमल घोडे, मंदा नायकवाडी, नवनाथ शिरतर, पल्लवी भंडारी
व इतरही ग्रामपंचायत सदस्यांसह विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष यांचेसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य जयवंत घोडके व राजेंद्र गाडगे यांनी सदर बांधकामाचा दर्जा चांगला राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.