आजच्या युवा पिढीने नोकरीकडे न वळता लघुउद्योगांकडे वाटचाल करावी:- संतोष डौले
1 min readराजुरी दि.५:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कौशल विकास कार्यशाळा “स्किलेज”या कार्यशाळेसाठी तिसऱ्या दिवशी सात्विक-डी फुड्स राजुरी औद्योगिक भेट देण्यात आली. त्यानिमित्त सात्विक- डी फुड्स चे युवा उद्योजक श्री संतोष डौले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी पारंपारिक शेतीकडे न वळता एका लघु उद्योगाकडे वाटचाल केले. आपल्या घरातील व्यक्तींना घेऊन त्यांनी एक छोटासा लघुउद्योग चालू केला या लघु उद्योगांमध्ये ते आज चकली, शंकरपाळी, लाडू यांसारखे खाद्यपदार्थ बनवत आहे. अतिशय मॉर्डन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे तसेच या खाद्यपदार्थांना आज मुंबई पुणे सह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पदार्थांचा दर्जा व गुणवत्ता यामुळे आज स्थानिक बाजारपेठेत सुद्धा या पदार्थांना खूप मागणी आहे. आज कुटुंबातील पाच सदस्यांबरोबर दोन कामगारांना रोजगार पुरवत आहे. पुढे भविष्यामध्ये आपला व्यवसाय अधिकाधिक वाढवण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांच्या पत्नी ही खांद्याला खांदा लावून संपूर्ण व्यवसाय सांभाळत आहे. विद्यार्थ्यांना नोकरीकडे न वळता या छोट्या छोट्या व्यवसायाकडे वळावे. तसेच त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समर्थ शैक्षणिक विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा.कल्याणी शेलार, प्रा. दिपक साबळे, प्रा. सद्दाम मनियार, प्रा. गणेश बोरचटे, प्रा. सतीश भवाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक साबळे व आभार प्रा. गणेश बोरचटे यांनी मांडले.