नांदूर रोड चौकात आमदार शरद सोनवणे यांच्या सूचनेनुसार टाकले डांबरी स्पीड ब्रेकर

1 min read

आणे दि.२:- श्री क्षेत्र आणे येथे कल्याण अहिल्यानगर महामार्गावर नांदूर रोड चौकात आमदार शरद सोनवणे यांच्या सूचनेनुसार पठारवासियांच्या सुरक्षिततेसाठी डांबरी गतीरोधक बसविण्यात आले. पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी तसेच आणे ग्रामपंचायतीने सरदार पटेल शाळा व आश्रमशाळा या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्याच्या गैरसोयीवर मात करत याकामी पाठपुरावा केला होता.NHAI कडे पाठपुरावा करताना बाबु उर्फ सचिन आहेर, रंगा आहेर तसेच पाटीलबा गाडेकर, प्रशांत दाते यांनी सहकार्य केले.या ठिकाणी गेल्या चार वर्षांत ज्या सात जणांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना ही खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त करत तुषार आहेर यांनी गतिरोधक बसविण्यासाठी यापूर्वी योगदान दिलेल्या शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले. कल्याण अहिल्यानगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून रोज अपघात या महामार्गावर होत आहेत. त्यामुळे ठीक ठिकाणी डांबरी गतिरोधक टाकल्यामुळे प्रवाशांना व वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे