श्री रंगदास स्वामी महाराज यात्रेत महाप्रसादासाठी ७९ कढाया आमटी, २ लाख भाकरी, १६ लाख रुपयांचा मसाला
1 min readआणे दि.२ :- आणे (ता.जुन्नर) येथील श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्सव सोहळा २४ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत संपन्न झाला. या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
मंगळवार (दि.३१) व बुधवार (दि.१) अशा दोन दिवस राज्यातील प्रसिद्ध आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला. गेल्या वर्षी ५५ कढया आमटीचा महाप्रसाद केला गेला होता परंतु यंदा भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्याने ७९ कढाया अशी विक्रमी आमटी केली गेली.
तर ६५ क्विंटल सुमारे दोन लाख बाजरीच्या भाकरी आसपास च्या गावातून वाजत- गाजत आल्या. यात्रोत्सवानिमित्त २९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीमध्ये बैलगाड्यांच्या भव्य शर्यती भरवण्यात आल्या होत्या. प्रथम क्रमांक ७५ हजार, द्वितीय क्रमांक ६५, तृतीय क्रमांक ५५ हजार असे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. गत वर्षी प्रमाणे या ही वर्षी भाविकांना आमटीचा महाप्रसाद घरी दिला गेला.
यासाठी पाच हजार पाच लिटरच्या किटल्या देवस्थानने आणल्या होत्या. तसेच यावर्षी पहिल्यांदाच आमटीचा मसाला देवस्थान च्या वतीने भाविकांना दिला गेला.
गेल्या वर्षी ४० कढाया आलेल्या भाविकांचा जेवनासाठी व १० कढाया वाटपासाठी भाविकांना घरी प्रसादासाठी बनवण्यात व वाढीव ५ कढया अशा ५५ कढया करण्यात आल्या होत्या.
यावर्षी ६९ कढया आमटी चे नियोजन करण्यात आले होते. परंतु भाविकांची गर्दी वाढल्यामुळे १० कढया वाढून ऐकून ७९ कढाया आमटी करण्यात आली. त्यामुळे यावर्षी भाविकांसाठी आमटी बनवण्याचा उच्चांक देवस्थान ने गाठला.
आसपासच्या १० ते १२ गावातून भाकरी वाजत गाजत येत असतात. यंदा सुमारे दोन लाख भाकरी आल्या होत्या. घरातील प्रत्येक माणसासाठी एक किलो पिठाच्या भाकरी व देवासाठी एक किलो अशा प्रत्येक घरातून भाकरी येतात.
या आमटी मसाल्यामध्ये हळद, मिरची, काळीमिरी, दालचिनी, लवंग, जायपत्री, मायपत्री, खसकस, जिरी, मोहरी,गुळ,गरम मसाला,धना पावडर,बेसन पीठ,खोबरे, तुरीची डाळ, तेल,शेंगदाणे,आमसूल, आमटीचा वेगळा स्पेशल मसाला अशा २० ते २१ पदार्थांपासून ३१४० किलो मसाला बनवला. तर १६ लाख रुपयांचा मसाल्याचा खर्च आला.]
आळेफाटा पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोलिसांच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही पोलीस सध्या वेशात भाविकांमध्ये फिरतहोते.
आळेफाटा पोलिसांच्या वतीने मुख्य रस्ते व चौकात सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
(२०३४ पर्यंत आमटी अन्नदात्याचे बुकिंग…
या आमटीच्या महाप्रसादासाठी सन २०३४ पर्यंत अन्नदात्यांचे बुकिंग झाले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, सरपंच प्रियांका दाते, उपसरपंच सुहास आहेर दिली आहे.
प्रतिक्रिया
“आणे गावात लाखो भाविक या वार्षिक यात्रोत्सवात येतात. १३८ वर्षांची आमटी-भाकरीची परंपरा आजही ग्रामस्थांनी अविरतपणे चालू ठेवली आहे. याचे उत्तम व आदर्श नियोजन देवस्थान व ग्रामस्थांनी केलेली आहे.”
– आमदार काशिनाथ दाते, पारनेर )