वाल्मिक कराड अखेर पुण्यामध्ये सीआयडीसमोर शरण

1 min read

पुणे दि.३१:- बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेला

वाल्मिक कराड अखेर पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आहे. त्याने एक व्हिडीओ प्रदर्शित करुन आपण शरण येत असल्याचे सांगितले. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अखेर तो पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे.

मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे.

वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. दरम्यान, वाल्मिक कराडसहीत एकूण 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हा वाल्मिक कराडसाठी मोठा धक्का मानला जात होता. खाती गोठवल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यामुळेच आज वाल्मिक कराड शरण आला. असे बोलले जात आहे. सीआयडीने फास आवळल्याने वाल्मिक कराड कोणत्याही क्षणी क्षरण येईल,

असं बोलले जात होते. अखेर तो पुण्यात सीआयडी समोर शरण आला असून या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही, सीआयडी ऑफिस, पाषाण रोड, पुणे येथे मी सरेंडर होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील. त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी आढळलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे. असं वाल्मिक कराड याने शरणागती पत्करण्यापूर्वी व्हिडिओ शेअर करत सांगितलं. या व्हिडीओमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची खंडणी मागितली नाही असा दावा केला आहे. तसेच आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचेही त्याने म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे