एटीएसकडून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक; राज्यात शोध मोहीम सुरू

1 min read

मुंबई दि.२:- अवैधरीत्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई सुरू आहे. त्यानुसार मंगळवारी नऊजणांना अटक केली. गेल्या महिनाभरात ४३ जणांना अटक केली आहे.एटीएसने दिलेल्या माहितीनुसार,विक्रोळी,नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबाद या शहरांमध्ये अवैधरीत्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशींचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली आहे.त्यामध्ये विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाच गुन्हे परकीय नागरिक कायदा १९४६, पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा १९५०, पारपत्र अधिनियम १९६७ प्रमाणे दाखल झाले आहेत. या कारवाईत आठ पुरुष आणि महिला असे एकूण ९ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे