माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने अवघा देश हळहळला; दिग्गजांकडून आदरांजली; देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर
1 min readनवीदिल्ली दि.२७:- भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं काल गुरुवारी रात्री दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांपासून ते अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानासाठी आदरांजली वाहण्यात येणार आहे. डॉ.मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांनी नम्र भावनेतून सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. देशाचे पंतप्रधान,अर्थमंत्री यासोबत केंद्रीय अर्थमंत्रालयातील सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार तसंच युजीसीचे अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केलं आहे. 2004 मध्ये देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून प्राथमिक शिक्षण घेतले. येथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही