कझाकिस्तानमध्ये १०५ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळले; रशियाला जात होते विमान

1 min read

अकताऊ दि.२५:- कझाकिस्तानमधील अकताऊ विमानतळजवळ एक प्रवासी विमान कोसळलं आहे. विमानात 105 प्रवासी आणि 5 क्रू मेम्बर्स होते. दुर्घटनेमागील कारणाचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आकाशातून विमान जमिनीच्या दिशेने जाताना दिसत आहे. लँडिगच्या तुलनेत विमानाचा वेग खूप होता हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानच्या अकताऊ शहरातील एअरपोर्टवर लँडिंगदरम्यान विमान कोसळले आणि विमानाताला मोठी आग लागली. या दुर्घटनेमध्ये किती प्रवासी जखमी झाले आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आली नाही. विमानात काही तात्रिंक बिघाड झाला होता. त्यामुळे या विमानाचे अकताऊ एअरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग करण्यात यावे यासाठी परवानगी मागण्यात आली होती. विमान लँडिंग करत असताना ते धावपट्टीवर जोरात कोसळले त्यानंतर विमानाला आग लागली. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे